नागार्जुन इन्स्टिट्यूट



नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट, नागपूर च्या वतीने सर्व प्राध्यापकां करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेमिनार हॉलमध्ये " यश, प्रेरणा आणि संघ बांधणी " या विषयावर एक दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (विद्याशाखा विकास कार्यक्रम) आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन  डॉ. प्रबोध पचपोर (मुख्य पाहुणे), प्रा.(डॉ.) एस.एम.केलो (प्राचार्य),  आणि प्रा. अतुल आकोटकर (संयोजक)  यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने दीपप्रज्वलन करून करण्यात आले.  


प्राचार्य डॉ. संजय केलो यांनी डॉ. प्रबोध पचपोर (प्रमुख पाहुणे, प्राध्यापक व डीन, श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय) यांचे शॉल व स्मृतीचिन्ह देउन सत्कार केला.  " यश, प्रेरणा आणि संघ बांधणी " या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची पार्श्वभूमी समजावून सांगितली. आपल्या भाषणात त्यांनी आदरणीय पाहुणे, विभागाध्यक्ष आणि संपूर्ण कर्मचारी यांचे स्वागत केले. 


डॉ. प्रबोध पचपोर यांनी प्रभावी पणे कशी संघ बांधणी करावी यावर लक्ष केंद्रित केले जे एक सामूहिक संस्कृती निर्माण करते, जी संघकार्याला चालना देते आणि सहकार्याला प्रोत्साहन देते. तसेच आईसब्रेकिंग आणि विविध संघ बांधणी उपक्रमांचे आयोजन केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्याचे जीवन शिक्षणात आनंदाने कसे उजळवायचे आणि समस्येला तोंड कसे द्यावे आणि शक्य तितके सर्वोत्तम उपाय कसे शोधायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांना एक चांगला नागरिक बनविण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणात प्राध्यापकांना केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती सोनटक्के यांनी केले, प्रा. कल्याणी फुलझेले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर प्रा. अतुल आकोटकर यांनी आभार प्रदर्शन केले.


Nagarjuna Institute of Engineering Technology & Management - NIETM, Nagpur.


#nietm

#nagarjunacollege

#nietmnagpur

#nagarjunainstituteengineering

#engineeringcollege

#nagpuruniversity

#college

#collegesinnagpur

#nagpurcollege

#engineering

#nagarjunainstitute

#engineeringcollegeinnagpur

#nagpurkar

#nagpur


Web: www.nietm.in


Facebook: https://www.facebook.com/nietm.nagpur/

Facebook Group: https://www.facebook.com/groups/nietm/

Instagram: https://www.instagram.com/nietm.nagpur/

Twitter: https://twitter.com/nietmnagpur

LinkedIn: https://www.linkedin.com/in/nagarjuna-institute-7a5542277/

YouTube: https://www.youtube.com/@nietm.nagpur

Blogs: https://nietmnagpur.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

Nagarjuna College

Glimpses of Induction Program B.Tech Students A.Y. 2022-23

Dhamma Chakra Pravartan Din 2023